मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा स्टार परदेशी खेळाडू ग्लेन मॅक्सवेल त्याच्या लग्नानंतर आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीमध्ये सामील झाला आहे. गेल्या मोसमातील त्याची कामगिरी अप्रतिम होती. यंदाही मॅक्सी आरसीबीच्या मिडल ऑर्डरची जान असणार आहे. यावेळीही त्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मॅक्सवेलनेही त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. मात्र असे असूनही तो आज म्हणजेच राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळू शकणार नाहीये.
RCBचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell) राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan royals) न खेळण्याचे कारण देत सांगितले, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्टपणे सांगितले आहे की कोणताही करारबद्ध खेळाडू ६ एप्रिलपूर्वी खेळण्यासाठी उपलब्ध असणार नाही. त्यामुळे ते पोहचल्यावरही काही फरक पडत नाही कारण ते ६ एप्रिलपूर्वी खेळू शकणार नाहीत. इतर कोणत्याही संघाप्रमाणे आम्हालाही याची चांगलीच जाणीव आहे. त्यानुसार आम्ही योजना आखली आहे. मॅक्सी (मॅक्सवेल) आमच्यासाठी ९ एप्रिलपासून उपलब्ध होईल.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयपीएल आधीच ही सूचना जारी केली होती. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल IPL 2022 मध्ये ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे आणि पुन्हा एकदा RCB च्या लाल आणि काळ्या जर्सीत कहर करताना दिसेल. सध्या तो क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर संघासह जोरदार प्रॅक्टिस करत आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांना ‘मुतऱ्या तोंडाचे’ म्हणत शिवसेनेनं केली होती जहरी टीका! आता मात्र बदललीय भूमिका
- “श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात ही होऊ शकते..” केआरकेचा मोदी सरकारवर निशाणा
- IPL 2022: SRH विरुद्ध फिफ्टी करताच के एल राहुलने बनवला रेकॉर्ड; सेहवागला मागे सोडले!
- “हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती”, भातखळकरांचा राऊतांना टोला
- संजय राऊतांची संपत्ती ईडीकडून जप्त; भाजपला इशारा देत म्हटले, “तुम्ही तुमची कबर…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

