मुंबई : पत्रकार गिरिश कुबेर यांच्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल आता अनेक जण उपस्थित करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप देखील काही संघटनांनी केला आहे. त्यामुळे कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे.
दरम्यान, गिरीश कुबेरांच्या या पुस्तकामुळे महाराष्ट्रात नवा वांदक निर्माण होत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. या पुस्तकातील काही आक्षेपार्ह मजकूरावर टीका केली जात आहे. परंतु यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी पुस्तकाचे लेखक गिरिश कुबेर अजूनही समोर आलेले नाही आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सावंगी तलावाच्या भिंतींना भेगा, तलाव फुटीचा संभाव्य धोका! मनपाची पाहणी
- एसटीतील कोरोना योध्यांचे शासन मदतीसाठी पात्र आठ प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडून!
- लसीकरणामुळेच कोरोना आटोक्यात येईल; पण सरकारला चिंताच नाही : राहुल गांधी
- परमबीर सिंह यांना मोठा दिलासा; ९ जूनपर्यंत अटक करणार नसल्याची राज्य सरकारची ग्वाही !
- कोरोनाची तिसरी लाट: औरंगाबादेत बालकांसाठी ७३७ बेड्सची व्यवस्था
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

