Share

आतापर्यंत मनसेने नेमकी कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरे यांनाही सांगता येणार नाही- सावंत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेअयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. येत्या १ ते ९ मार्च दरम्यान राज यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं समजतं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची आज दुसऱ्यांदा महत्वपूर्ण बैठक होत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित आहेत.

मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, युतीच्या या गणितांबाबत भाजप नेत्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार दिला नव्हता.

या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आतापर्यंत मनसेने नेमकी कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरे यांनाही सांगता येणार नाही. मनसेच्या भूमिकेत वारंवार बदल होतच राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांचं एक ठाम असं काही नसतं, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले.अयोध्येला जाणे हा त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. कुणी कुठेही जाऊ शकतं पण जे झेंडे बदलतात त्यांच्याविषयी काय बोलणार, असं सावंत म्हणाले. TV9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान,कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या नावाखाली सेक्युलर वादाला बाजूला सारत हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत सत्ता उपभोगत असणाऱ्या कॉंग्रेसने भूमिका बदलाबाबत मनसेवर टीका केली आहे. आता मनसे या टीकेला कश्या पद्धतीने प्रत्युत्तर देणार हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!