Share

बीडमध्ये संदीप क्षीरसागरांना धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदिप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. नगर पालिकेतील विरोधकांकडून निवडून आलेल्या चार नगरसेवकांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. वॉर्डाच्या विकासासाठी आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

बीड नगर पालिकेतील काकू नाना आघाडी मधून विजय मिळवलेल्या प्रभाकर पोकळ, गणेश तांदळे, रणजित बनसोडे, भैय्यासाहेब मोरे या चार नगरसेवकांनी आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. चार नगरसेवकाच्या प्रवेशाने शिवसेनेची नगरपालिकेत मोठी ताकद वाढली आहे.

या आधीही काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आम्ही काकू नाना आघाडीतून निवडून आलो. पण आम्ही आमच्या भागाचा विकास या चार वर्षांत करू शकलो नाहीत. उर्वरित एक वर्षात तरी वार्डाचा विकास करता यावे, या उद्देशाने आज आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत. आम्ही विरोधी बाकावर असूनही नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आमच्या भागातील विकासासाठी मोठे प्रयत्न केले आहेत, अशी भावना शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी व्यक्त केल्या.

दरम्यान ज्या नगर पालिकेच्या रणभूमीवर काकांविरुद्ध रणशिंग फुंकून त्यांना जेरीस आणले, तेथूनच आता एकेक शिलेदार काकांच्या तंबूत परतत असल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुतण्या संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडून हा दुसरा धक्का आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या विषय समिती सभापती निवडीतही काकू-नाना आघाडीने शस्त्र म्यान केल्याने काका नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर गटाने सर्व समित्यांवर एकतर्फी झेंडा फडकविला. सत्तेतली आमदारकी मिळाल्यानंतरही संदीप क्षीरसागर समर्थकांत नाराजांची संख्या हळुहळू वाढतच जाण्याचे कारण काय, याची चिकीत्सा आणि त्यावर उपाय योजना होताना दिसत नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!