Share

राज्यात आलबेल; पण स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत बिघाडी

Published On: 

🕒 1 min read

बीड : सत्तेसाठी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले. वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षांचे सर्व काही आलबेल सुरू असल्याचे त्या त्या पक्षांचे नेते सांगत आहेत. किंबहुना तसे दाखवत आहेत. मागे शिवसेनेबाबत काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून तर काँग्रेस आणि शिवसेनेत खदखद सुरूच आहे.

परंतू, आता स्थानिक पातळीवर तिनही पक्षांमधल्या कुरबुरी आणि वाद नेहमी समोर येत आहेत. सत्तेच्या राजकारणात शिवसेना आणि काँग्रेसला डावलण्यात येत असल्याचा आरोप दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

सत्तेच्या राजकारणात आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते दादासाहेब मुंडे यांनी केला आहे. पालकमंत्री असलेल्या पक्षाला महामंडळात 60 टक्के वाटा, तर इतर दोन पक्षांना 20-20 टक्के वाटा, हा फॉर्म्युला ठरलेला आहे. मात्र, बीडमध्ये असे काही होत नसल्याची टीका शिवसेना नेते दिलीप गोरे यांनी केला आहे. स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर सर्व काही आपल्याच ताटात ओढत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, बीडमध्ये महाविकास आघाडीतील पक्षात चढाओढही सुरू झाली आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या समर्थक चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि सेनेची वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचे दिसते. याचे राज्यातील घडामोडींवर काय परिणाम होणार हे आगामी काळात पाहायला मिळेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!