Share

कुलाबा येथील महापालिका शाळा आरक्षण मागच्या दाराने रद्द करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव – भाजपा

Published On: 

मुंबई : ‘ए’ विभाग कुलाबा येथील न.भू.क्र. ३४७, ३४८, ३४९ एकूण क्षेत्रफळ ७२५.७५ चौ.मी. या भूभागावरील महापालिका प्राथमिक शाळा आरक्षणाबाबत जमीन मालकाने दि.२०/०१/२०२१ रोजी खरेदी सूचना बजावली आहे. या खरेदी सूचनेवर एक वर्षाच्या कालावधीत निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा आरक्षण व्यपगत होईल. सदर विषय सुधार समितीच्या दि. २९/०१/२०२१ रोजीच्या सभेत चर्चेला आला असता भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांनी सदर खरेदी सूचना त्वरित मंजूर केली पाहिजे आणि कुलाबा विभागातील नागरिकांना महापालिका प्राथमिक शाळा असे आरक्षण लवकरात लवकर उपलब्ध केले पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली.

सदर खरेदी सूचनेचा प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठविण्यासाठी शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी कोणतेही संयुक्तीक कारण न देता उपसूचना मांडली. या उपसुचनेस भाजपसह कॉंग्रेस नगरसेवकांनी विरोध दर्शविला.शिवसेना पक्षाचेच मुख्यमंत्री असलेल्या शासनाने दि. २०.०७.२०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४९ (४) अन्वये सदर खरेदी सूचना कायम करण्यात आली. या खरेदी सूचनेबाबत संपुर्ण भूभागाच्या संपादनाची कार्यवाही विहित मुदतीत पार पाडण्याबाबत महापालिकेला निर्देश दिले आहेत. स्वपक्षीय मा. मुख्यमंत्र्यांच्या शासनाने दिलेले आदेश महानगरपालिकेत त्याच पक्षाचे सत्ताधारी पाळत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे अशी खंत विनोद मिश्रा यांनी व्यक्त केली .

प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठविणे म्हणजे मागच्या दाराने आरक्षण व्यपगत करण्याचा प्रयत्न करणे आहे असा आरोप नगरसेवक अभिजित सामंत यांनी केला.या विषयावर नगरसेविका शितल गंभीर देसाई, नगरसेवक हरिष छेडा यांनी चर्चेत भाग घेतला. सदर विषयावर भाजपच्या नगरसेवकांना काँग्रेस सदस्यांनीही चर्चेत पाठिंबा दिला.

याबाबत महापालिका भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा यांनी मतदानाची मागणी केली असता प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठविण्याची उपसूचना मतास न टाकता दडपशाही करत सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा गळा घोटत प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविला. सुधार समिती अध्यक्षांच्या या कृतीचा भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा यांनी तीव्र शब्दात निषेध करत आरक्षण व्यपगत करण्याचा सत्ताधारी पक्षाचा डाव आम्ही यापुढील प्रत्येक बैठकीत हाणून पाडू असे प्रतिपादन करून सभात्याग केला अशी माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!