🕒 1 min read
नवी दिल्ली: २६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.
या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चा वेळी आंदोलकांनी घातलेल्या हैदोसाला दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. आंदोलकांना भडकावल्या प्रकरणी राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर, योगेंद्र यादव यांच्यासह ३७ शेतकरी नेत्यांवर देखील विविध प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान, ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रजासत्ताकदिनी हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले. या हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा केंद्र सरकारचा हेतू होता’, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर, याप्रकरणी चांगलेच राजकारण तापले आहे.
या पार्श्वभूमीवर, लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारमधील माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी देखील मोदीं वर टीका केली आहे. यावेळी त्यांनी ट्वीट करत, ‘मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरु शकतील, पण तुमचं पोट देशाचा शेतकरी भरतो, अशी आठवण यादव यांनी करुन केलीय. शेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय. आंदोलकांवरील सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराचाही त्यांनी कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
मनसेच्या मोठ्या बैठकीला राज ठाकरेंच्या स्नुषा मिताली ठाकरेंची उपस्थिती; चर्चांना उधाण !
- …त्यासाठी आम्ही राज ठाकरेंना मार्गदर्शन करू, संजय राऊतांचे मोठे विधान
- भाजपा पक्ष विनाशाच्या खाईत चाललाय, रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर अमोल मिटकरी संतापले
- सरकारचे वरातीमागून घोडे, शेतकऱ्यांनी कापूस विकल्यावर दरामध्ये वाढ
बीडमध्ये संदीप क्षीरसागरांना धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

