🕒 1 min read
पुणे : नुकतेच वाईन विक्रीवरून ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर(Bandatatya Karadkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले बघायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका केली आहे.
सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘टिळा टोपी घालुनी माळा। म्हणती आम्ही साधू॥ दयाधर्म चित्ती नाही। ते जाणावे भोंदू॥ वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले आहेत जे ह.भ.प. म्हणवून घेतात. कितीही दडवली तरी बोलण्यातून चड्डी दिसतेच. समाजात विष पसरविण्याचा यांचा डाव आहे. तुकाराम महाराजांनीच याबाबत सावध केले आहे’, असे सावंत म्हणाले आहेत.
टिळा टोपी घालुनी माळा । म्हणती आम्ही साधू ॥
दयाधर्म चित्ती नाही। ते जाणावे भोंदू ॥
वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले आहेत जे ह.भ.प. म्हणवून घेतात. कितीही दडवली तरी बोलण्यातून चड्डी दिसतेच. समाजात विष पसरविण्याचा यांचा डाव आहे. तुकाराम महाराजांनीच याबाबत सावध केले आहे.— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 4, 2022
दरम्यान, यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बंडातात्या म्हणाले की,‘पंकजा आणि सुप्रियाताई यांच्याबद्दल मी आकसाने बोललो नसून मी फक्त समाजातील ऐकीव माहितीवर ते वक्तव्य केले. पंकजा आणि सुप्रियाताई यांचे वर्तन चुकीचे नाही. त्या सदाचारी आणि निर्व्यसनी आहेत. तसेच त्यांना भेटून मी दिलगीरी व्यक्त करणार आहे’, असे बंडातात्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे आणि मी अनेकवेळेला अनेक कार्यक्रमात एकत्र आलो असून मी त्यांना ताई म्हणतो. तसेच पंकजा यांनाही मी कन्येच्या ठिकाणी मानतो, असेही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सगळ्याच राजकीय पक्षात नाराजीचे वातावरण
“बंडातात्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय…” अशा घोषणा देत राष्ट्रवादीचं पुण्यात आंदोलन
अमृता फडणवीसांनी सांगितला ‘त्या’ ट्विटचा अन्वयार्थ, “म्हणाल्या मागून वार करणाऱ्यांना…”
संसदेतही पवार-विखे वादाचे पडसाद; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खाल्ल्या मिठाला जागावं…”
‘तुम्ही तोंड सांभाळून बोला’; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

