🕒 1 min read
मुंबई : राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्विटमुळे मोठा वाद उद्भवला होता. आज अमृता फडणवीस यांनी या ट्विटचा अन्वयार्थ सांगितला आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या, ट्विटचा अन्वयार्थ असा की, महाराष्ट्रात मुंबईत तुम्ही पहा किती इशू चालू आहेत, एसटी कर्मचारी आंदोलन, रस्ते, आपण तीथे लक्ष न देता खिशे भरवण्याकडे लक्ष देत आहात, दुसरीकडे लक्ष न देता जिथे मुंबईला गरज आहे तीथे लक्ष द्या, महावसूली सरकारने त्यांच्यातले गूण सुधारण्याची गरज आहे. नॉटी असो की नामर्द ज्यांच्या बाबतीत मी हा शब्द वापरला त्यांना लोकांनीच हे नावे दिले आहेत. त्यांनी चुकीच्या पोस्ट केल्या म्हणून मी ते ट्विट केलं, यांनी समोरून वार न करता चुकीच्या पद्धतीने मागून वार केला, म्हणून मी तो शब्द वापरला. असे स्पष्टीकरण अमृता फडणवीसांनी दिले आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule and Pankaja Munde) या दारू पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे. त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी बंडातात्यांच्या पुतळ्याचं दहन केलं जात आहे. हा वाद वाढत चालल्याने बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
