पुणे: महाराष्ट्रतील सत्ताधारी पक्षाचा नेहमीच पुणे महानगरपालिकेची नवीन प्रभाग रचना करताना वरचष्मा राहिला आहे. नुकतीच १ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवीन प्रारूप रचना जाहीर झाली. त्यात अनेक बड्या नेत्यांचे प्रभाग तोडून ते वेगळ्याच प्रभागात जोडण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप हे भलतेच आंनदात दिसत आहेत, तर भाजपचे गणेश बिडकर यांनी नवीन प्रारूप रचनेच्या विरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे म्हंटले आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपण राहत असलेल्या प्रभागाच्या शेजारील प्रभागात पण लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना बदलणार असल्याने विद्यमान नगरसेवकांकडून स्वत:च्या प्रभागाबरोबरच आता लगतच्या प्रभागातही विकासकामे सुचविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
यात प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि शिवसेनेचे इच्छुक उमेदवार तसेच विद्यमान नगरसेवकांचा पण समावेश आहे. आपल्या शेजारच्या प्रभागातील कामांसाठी तरतूद करण्यासाठीची पत्रे नगरसेवकांकडून महापालिका प्रशासनाला देण्यास सुरूवात झाली असून अशी शेकडो पत्रे प्रशासनाला प्राप्त झाली आहेत. २०२१ महिन्यातील नोव्हेंबर महिन्यातच पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही त्रिसदस्यीय होणार आहे हे स्पष्ट होताच सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक आता शेजारच्या प्रभागात लक्ष घालायला लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले १२० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील असा आत्मविश्वास बाळगून आहे तर पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष अडचणीत सापडला आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि विद्यमान सभागृह नेते गणेश बिडकर यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला पुणे महानगरपालिकेत सत्तेत यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आपल्या बाजूने वळवूनच सत्तेत येऊ शकतो असा आरोप केला आहे. पण हे म्हणत असतानाच पुणे भारतीय जनता पक्षाचा कोणताच नगरसेवक आपला पक्ष सोडून जाणार नाही ह्याची खात्री बोलून दाखवली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला अटक…
- “मुंबईतीत ३ टक्के घटस्पोट वाहतूक कोंडीमुळे होतात”, अमृता फडणवीसांचा दावा
- “तुम्ही हे विसरून जा, की मी देवेंद्र फडणवीसांची बायको आहे” – अमृता फडणवीस
- कंगना रणौतने सलमान खानवर साधला निशाणा म्हणाली, “हे तुमच्या भाईचे घर..”
- “RSS हे पुरोगामी विचारांचे”, अमृता फडणवीसांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

