🕒 1 min read
नवी दिल्ली : पवार आणि विखे वाद महाराष्ट्राला नवा नाही. राज्याने या कुटुंबात अनेकवेळा राजकीय संघर्ष झाल्याचे पाहिले आहे. राजकारणात नेहमीच शरद पवार विरूद्ध विखे असं चित्र राहिलं आहे. दरम्यान या दोन परीवारातील वाद संसदेत देखील पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. सुजय विखे यांनी यूपीए सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. या टीकेला सुप्रिया सुळेंनी देखील प्रत्युत्तर दिल. संसदेत नेमकं काय झाल जाणून घेऊया.
सुजय विखे यांनी संसदेत पाटील यूपीए सरकारच्या कामावर टीका केली, ते म्हणाले राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ७० टक्के साखर कारखाने विकत घेतले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी सुजय विखेंना चांगलच सुनावलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “यूपीए सरकारच्या काळात हे स्वतः काँग्रेसमध्ये होते. हे स्वतः यूपीए सरकारच्या योजनांची लाभार्थी होते. खाल्ल्या मिठाला जागावं.. माझ्या आईने मला दिलेली शिकवण आहे.”
“यूपीए सरकारमध्ये असताना सुजय विखे यांचे वडील मंत्री होते. त्यावेळी गांधी परिवाराशी ते भेटायचे. त्यावेळी जी धोरणं तयार केली गेली त्यात ते होते, त्यामुळं खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे असं मला माझी संस्कृती सांगते”, असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी विखेंना लगावला.
या वादावर सुजय विखे पाटील यांनी एका वृत्तावाहीनीशी संवाद साधला. ते म्हणाले, “सुप्रिया सुळे बोलत होत्या तेव्हा दुर्दैवाने मी लोकसभेत नव्हतो. वेळ येईल तेव्हा मी संसदेत उत्तर देईन. मी जे चार मुद्दे मांडले तुम्ही त्याला खोडून काढा. महाविकास आघाडी सरकारचे खासदार केंद्राच्या योजनांचे कार्यक्रम घेतात तेव्हा मोदींचे फोटो का नाही लावत. ज्या केंद्राच्या योजनांचा फायदा घेता किमान त्याचा उल्लेख करा.”
यावेळी सुजय विखे यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. विखे म्हणाले, “साखर उद्योगाला आलेलं स्थैर्य केवळ मोदी सरकारच्या निर्णयामुळे आले आहे. मोदींमुळेच साखर कारखाने टिकले. महाविकास आघाडीच्या अनेक खासदारांचे सहकारी कारखाने आहेत. किमान माणुसकीच्या नात्याने केंद्राने दिलेल्या लाभांचा उल्लेख करा”
महत्वाच्या बातम्या :
- “RSS हे पुरोगामी विचारांचे”, अमृता फडणवीसांचे मोठे वक्तव्य
- चायनाच्या कमांडरमुळे भारताचा बीजिंग ऑलिंपिकवर बहिष्कार टाकायचा निर्णय
- “महिलांवर टिपणी करणे चुकीचे…”, अमृता फणडवीसांचा बंडातात्यांना सल्ला
- विराट कोहलीने केले यंग ब्रिगेडला मार्गदर्शन
- गोत्यात आल्यावर फोडले पत्रकारांवर खापर! बंड्यातात्याची वादग्रस्त मालिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
