भंडारा: किरणा दुकानातून वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला भाजप नेत्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. परंतु, आता किराणा दुकानातून वाईन विक्री करण्यास विरोध करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हल्लाबोल केला होता. सर्वात जास्त दारू पिणारे भाजपमध्ये आहेत असा टोला नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना लगावला होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या त्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मलिकांना सणसणीत उत्तर दिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी ते आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवाब मलिकांच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
नवाब मलिकांनी केलेल्या त्या वक्तव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकारणातील सर्व लोक काचेच्या घरांत राहतात. त्यामुळे कुणीही कुणावर दगड फेकू नये. दगड मारताना विचार केला पाहिजे. नवाब मलिकांच्या नेत्यांना (NCP leaders) काही म्हटलं, तर यांना चालत नाही. त्यामुळे त्यांनी तोंड सांभाळून बोलले पाहिजे, असा इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“मुंबईतीत ३ टक्के घटस्पोट वाहतूक कोंडीमुळे होतात”, अमृता फडणवीसांचा दावा
तुम्ही हे विसरून जा की मी देवेंद्र फडणवीसांची बायको – अमृता फडणवीस
कंगना रणौतने सलमान खानवर साधला निशाणा म्हणाली, “हे तुमच्या भाईचे घर..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

