🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या युरोपमध्ये युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी आपले लष्कर युक्रेनमध्ये घुसवले. रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे. व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवरचे हल्ले थांबवावे याकरता जगातील अनेक बलाढ्य देश आणि विविध जागतिक संघटना प्रयत्न करत आहेत.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आमचे लष्कर युक्रेनमध्ये असलेल्या कोणत्याही सामान्य नागरिकाला त्रास देणार नाही अशी ग्वाही दिली आहे. व्लादिमीर पुतीन यांनी अशी ग्वाही दिली असली तरी रशियन लष्कराच्या हल्ल्यांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. मात्र नुकताच रशियाने तात्पुरत्या युद्ध बंदीचा (ceasefire) निर्णय घेतला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या इतर देशातील नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडायला मदत व्हावी म्हणून व्लादिमीर पुतीन यांनी तात्पुरत्या युद्धबंदीचा (temporary ceasefire)निर्णय घेतला आहे.
युक्रेनमध्ये असणाऱ्या मारियुपोल आणि व्होल्नोवाखा या दोन शहरातून सामान्य नागरिकांना सहज रित्या बाहेर पडता यावे याकरता व्लादिमीर पुतीन यांनी तात्पुरत्या युद्धबंदीचा (temporary ceasefire)निर्णय घेतला आहे. ग्रीन विच मीन ( Greenwich Mean Time ) नुसार ६ वाजल्यापासून रशिया काही काळापुरते युक्रेनवरील हल्ले थांबवणार आहे. सामान्य नागरिकांना युक्रेनमधून सहज रित्या बाहेर पडता यावे म्हणून हा निर्णय घेतला असल्याची माहिती आज रशियन मीडियाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND VS SRI : सर जडेजाने मोहालीत रचला इतिहास, असा कारनामा करणारा दुसराच भारतीय
- ४ एकरात १० लाखांपर्यंत उत्पन्न; खरबूज लागवड पडली फायद्यात!
- “फोन टॅपिंगच्या घटना फडणवीस असतांना घडल्या, मात्र त्याची किंमत…”, शरद पवारांचा इशारा
- शेन वॉर्नने ‘ज्या’ खेळाडूला स्वार्थी म्हटले होते तोही आज दुःखात; म्हणाला…
- राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करताय; संजय राऊतांचा प्रहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
