Share

४ एकरात १० लाखांपर्यंत उत्पन्न; खरबूज लागवड पडली फायद्यात!

Published On: 

जळगाव : चांगली शेती केली तर शेतकरी लाखोमध्ये उत्पन्न घेऊ शकतो. फक्त जी पिके घेतली जातात त्या पिकांचे व्यवस्थापन उत्तम होयला हवे. अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आपण पाहूया. ज्याने ४ एकरात खरबूज लागवड केली. ज्यातून तब्बल १० लाख उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

चोपडा तालुक्यातील नारद येथील तरुण शेतकरी दिग्विजय पाटील असे नाव आहे. या शेतकऱ्याने ४ एकर खरबूज लागवड केली. १६ डिसेंबर रोजी मल्चिंग पेपरवर या तरुण शेतकऱ्याने खरबूज लागवड केली. आता खरबूज शेतीला ९० दिवस पूर्ण झाले आता खरबूज काढला जात आहे असे सांगितले आहे.

सध्या शेतातून खरबूज काढणी सुरू आहे. ४ एकर खरबूज शेतीला दोन लाखापर्यंत खर्च लागला. आणि उत्पादन सुरु झाले आहे. खरबूजला २२ रुपये भाव मिळाला. सध्या जवळपास ५० टन खरबुजचा माल निघाला आहे. अजून शेतात बराच माल असल्याने खर्च वजा करून तब्बल १० लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे असे या तरुण शेतकऱ्यांने सांगितले. मल्चिंग पेपरचा फायदा म्हणजे, मल्चिंग पेपरमुळे अनावश्यक खर्च टळतो आणि पिकांची ग्रोथ देखील उत्तम राहते आणि उत्पादनात देखील चांगली वाढ होते.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!