Share

IND VS SL : सर जडेजाने मोहालीत रचला इतिहास, असा कारनामा करणारा दुसराच भारतीय

Published On: 

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या सामन्यात नाबाद १७५ धावा केल्या आहेत. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. या शतकासह त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधील ५ हजार (५१०७) धावांचा टप्पा पार केला आहे.

भारताकडून ५ हजार धावा आणि ४०० विकेट्स घेणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे. जडेजाने २८४ सामन्यात हा पराक्रम केला आहे. या अगोदर हा विक्रम माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या नावावरती होता. कपिल देव यांनी भारताकडून ३५६ आंतरराष्ट्रीय सामने खेळत. ९०३१ धावा आणि ६८७ विकेट्स घेतल्या आहेत. नाबाद १७५ ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे.

जडेजाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून ४६८ विकेट्स घेतल्या आहेत. दुखापती नंतर पुनरागमन करत जडेजाने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. या अगोदर टी२० मालिकेतही त्याने जबरदस्त प्रदर्शन केले होते.

३३ वर्षाच्या जडेजाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक केले आहे. त्याने ५७ कसोटी सामन्यात ३३.७६ च्या सरासरीने २१९५ धावा केल्या आहेत. तर १६८ वनडेत ३२.५८ च्या सरासरीने २४११ धावा, व ५८ टी२० मध्ये २१.७३ च्या सरासरीने ३२६ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!