Share

Russia-Ukraine war : जागतिक दबाव तरी, युक्रेनमध्ये रशियाचे आक्रमण दुसऱ्या दिवशीही सुरूच

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले असून जागतिक दबाव असूनही दोन्ही देशांनी युद्धाची भूमिका मागे घेतलेली नाहीये. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी गुरुवारी (२४ फेब्रुवारी) युक्रेनमध्ये आक्रमण सुरू केल्याने राजधानी कीवसह प्रमुख शहरे लष्करी हल्ल्यांखाली आली आहेत.

कीववरील युद्धाच्या विरोधात प्रचंड निदर्शने करण्यात आली आहेत. दरम्यान रशियामध्ये १ ,७०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (President of Ukraine Volodymyr Zhelensky) यांनी कीवमध्येच राहण्याची भूमिका घेतली आहे. युरोपमधील दुसऱ्या महायुद्ध नंतरची ही सर्वांत मोठी लढाई म्हटली जात आहे.

दरम्यान “रशियाने वाईट मार्गावर सुरुवात केली आहे, परंतु युक्रेन स्वतःचा बचाव करत आहे आणि आपले स्वातंत्र्य सोडणार नाही,” असे ट्वीट करत झेलेन्स्की यांनी आपली भूमिका सोडलेली नाहीये.

१६००० लोकांना भारतात परतण्याचे आव्हान-

दरम्यान भारत युक्रेनमधून सुमारे १६००० लोकांना सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली असून परराष्ट्र मंत्रालय स्थलांतरासाठी जमीन मार्गांची यादी तयार करत आहे.

तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी “पुतिन हे आक्रमक आहेत. पुतिन यांनी हे युद्ध निवडले. आणि आता त्याचे परिणाम त्यांना आणि त्यांच्या देशाला भोगावे लागतील.” असे म्हटले आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यातही रशिया-युक्रेन युद्ध संदर्भात चर्चा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!