🕒 1 min read
मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (K. Chandrashekhar Rao met Chief Minister Thackeray) यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचीही उपस्थिती होती. मात्र त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अजून स्पष्टता मिळाली नाही. मात्र यानंतर चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकारणात चर्चा रंगली आहे.
“आमच्या बैठकीचा चांगला परिणाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. असे म्हणत के चंद्रशेखर राव यांनी मी उद्धवजींना तेलंगणात येण्याचे निमंत्रण देतो”, असे म्हटले आहे. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. मात्र राव यांनी दिलेल्या संकेतामुळे आता राजकारणात नव्या चर्चांना उधान आले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर राव यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पुराव्याची मागणी केली होती. दरम्यान बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच नवी दिल्लीत बैठक होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनीही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे स्टॅलिन, तेलंगणचे चंद्रशेखर राव या प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट होण्याची चित्रे सध्या दिसून येत आहे. त्यात आजची भेट याला नवे वळण देऊ शकते, असे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; तेजस ठाकरेंची उपस्थिती चर्चेत
- ‘आपल्याच देशात भगवद् गीतेच्या पठणाला विरोध…’; आमदार नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; अतुल लोंढे भाजप मंत्र्यावर संतापले
- ‘शिवरायांच नाव घेऊन शिवसेना राजकारण करत आहे’; पूनम महाजन यांचा आरोप
- “मराठी भाषा गौरव दिन जेवढा भव्य करता, तेवढा करा”, मनसेचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
