Share

अरेरे! पीएसएलचे अजब रंग; कॅच सोडली म्हणून बॉलरने फिल्डरच्या कानाखाली लगावली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२२ मैदानाबाहेरील वादांमुळे तसेच काही चमकदार ऑन-फिल्ड अॅक्शनसाठी चर्चेत आली आहे. अॅलेक्स हेल्स आणि पॉल स्टर्लिंगसह परदेशी खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे माघार घेणे असो कि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू जेम्स फॉकनरने हॉटेलच्या मालमत्तेचे नुकसान करणे या सगळ्या गोष्टींमुळे पीएसएल चर्चेत आला आहे. याच स्पर्धेत नुकतीच एक अजब घटना घडली आहे ज्यात बॉलरने फिल्डरच्या कानाखाली लगावली.

लाहोर कलंदरच्या वेगवान गोलंदाज हारिस रौफने सामन्यादरम्यान एक विकेट घेतल्यावर त्याचा सहकारी कामरान गुलामला आनंदाने आणि धक्कादायकपणे कानाखाली लावली. झाले असे कि , कामरान गुलामने पेशावर झल्मीच्या हजरतुल्ला झाझाईला याची कॅच सोडली होती, मात्र त्याच ओव्हरमध्ये रौफला विकेट मिळाली. तेव्हा गुलाम रौफकडे हाय-फाइव्हसाठी गेला आणि तेव्हाच रौफने निराश होऊन त्याला कानाखाली मारली.

यावेळी कामरान हसताना दिसला तरीही गोलंदाज रौफ काही वेळा त्याच्याकडे गंभीरपणे पाहत होता. हारिस रौफला त्याच्या मैदानावरील कृत्याचे कारवाई स्वरूपात काही परिणाम भोगावे लागतील की नाही हे पाहणे बाकी आहे. पीएसएल २०१६ मध्ये, वहाब रियाझने अहमद शहजादला ढकलले होते आणि जवळपास मारहाण केली होती. वेळेवर हस्तक्षेप केल्याने गोष्टी ओव्हरबोर्ड होण्यापूर्वी थंड झाल्या. शहजादला त्याच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला तर रियाझला त्याच्या खेळाच्या कमाईतील ४० टक्के नुकसान झाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!