🕒 1 min read
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन युद्धवाद सुरु आहे. ज्याचे पडसाद जगभर उमटत आहे. पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या युक्रेन (Ukraine)आणि रशिया (Russia)यांच्यातला तणाव काही नवीन नाही. मात्र आता हा तणाव इतका वाढला आहे की, युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान यूक्रेनपासून वेगळं होत रशियासमर्थक पूर्व भागात संघर्ष वाढल्यानंतर सैन्याच्या तैनातीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. स्वयंघोषित प्रजासत्ताक डोनेत्सक आणि लुहंस्कमधील सर्व तरुणांना, ज्यांचे वय लढण्यायोग्य आहे, त्यांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान एकीकडे रशियाने युक्रेनजवळच्या सीमांवर सुमारे १ लाखांचं सैन्य तैनात केलं आहे. पण दुसरीकडे आपला युक्रेनवर हल्ला करण्याचा इरादा नसल्याचं रशियाने म्हटलं आहे. त्यात रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता असतानाच अमेरिकेने युक्रेनसाठी 1 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत.
या युद्धात रशियानं युक्रेनवर हल्ला केला तर रशिया तेल आणि गॅसचा पुरवठा बंद करेल आणि किंमती वाढतील अशी भीती युरोपीयन देशांना वाटत आहे.रशिया आणि युक्रेनमधील या तणावामुळे गेल्या एका महिन्यात तेलाच्या किंमतीत 14 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे यांच्यात युद्ध झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला! म्हणाले, “मत खाण्याच्या…”
- अरेरे! पीएसएलचे अजब रंग; कॅच सोडली म्हणून बॉलरने फिल्डरच्या कानाखाली लगावली
- ‘शिवराळ भाषेचा वापर करण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांनी आपल्या…’; गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला
- मोघलांना जसे संताजी-धनाजी दिसायचे तसे केंद्राला महाराष्ट्र दिसतो – जयंत पाटील
- साहाला धमकी देणारा पत्रकार चाहत्यांनी सापडला; नाव होतंय व्हायरल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
