Share

रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला! म्हणाले, “मत खाण्याच्या…”

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: केंद्रीय मंत्री  रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की,”बाबासाहेबांनी सुरु केलेला रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्याची गरज आहे. तसेच दलित ऐक्यासाठी पुढे आले पाहिजे. दलित पँथरची स्थापना नव्याने करण्याची गरज आहे.”

दरम्यान रामदास आठवले यांनी औरंगाबादमध्ये रिपब्लिक ऐक्याचा पुन्हा एकदा उल्लेख करत प्रकाश आंबेडकर यांना सल्ला दिला. ते म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये भाजपला तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील. आम्ही उमेदवार उभे केले नाही. आमचा भाजपला पाठिंबा आहे. दलित मतांवर मायावतींनाच फक्त अधिकार नाही. दलित ऐक्यासाठी पुढे आले पाहिजे. दलित पँथरची स्थापना नव्याने करण्याची गरज आहे, सत्तेत येणाची इच्छा प्रत्येकाला असते मात्र तशी ताकद निर्माण झाली पाहिजे. विखूरलेला समाज एकवटण्याची गरज आहे.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीचा जनाधार कमी होत आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी गंभीर विचार केला पाहिजे. मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा मात्र यापूर्वी त्यांनी जागा निवडणून आणल्या नाहीत.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!