Share

Russia | पुतीन यांच्या घोषणेनं दहशत! नागरीकांची देश सोडण्याची गडबड तर फ्लाईट्स देखील बंद

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  गेल्या सहा महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. अशातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेल्या घोषणेमुळे रशियामध्ये खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर देशाचे नागरिक देश सोडण्याच्या तयारीत लागले असून फ्लाइट्स देखील पूर्ण भरण्यात आले आहेत.

वाढणाऱ्या फ्लाईट्सच्या बुकिंगमुळे तिकिटांचे दर देखील आभाळाला भिडले आहेत. पुतीन यांनी सैन्याची जमवाजमव करण्याची घोषणा केली आहे. त्याचे परिणाम रशियामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गेल्या दोन दिवसात पुतीन यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या असल्याने संपूर्ण जगावर चिंतेच आभाळ दाटून आलं आहे.

युक्रेनचे चार भूभाग म्हणजे 20 टक्के प्रांत रशियाला जोडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासोबत तीन लाख राखीव सैन्याच्या तैनातीचा आदेशही देण्यात आला आहे. रशियाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाल्यास आमच्याकडे असलेल्या सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करण्याचा थेट इशारा रशियाने पाश्चिमात्य देशांना दिला आहे.

दरम्यान, पुतीन यांनी केलेल्या कॉल अप च्या घोषणेमुळे युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर रशियाच्या सीमा देखील बंद केल्या जाऊ शकतात. त्यामुळेच रशियन नागरिक सध्या देश सोडण्याच्या मार्गावर आहेत. एवढेच नाही तर अनेकांनी फक्त वनवे तिकीट बुक केले आहेत.

देशाची परिस्थिती बिघडत चालली असून काही ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आली आहेत. रशियन एअरलाइन्सने 18 ते 65 वर्षे वयोगटात मोडणाऱ्या व्यक्तींना तिकीट विकण्यास नकार दिला आहे. पुतीन यांच्या घोषणेमुळे केवळ युक्रेनच नव्हे तर पोलंड, रोमानिया, मॉल्डोवा, स्वीडन, फिनलँडसारख्या देशांची चिंता वाढत चालली आहे. या युद्धात देशांनी उघडपणे युक्रेनचं समर्थन केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!