🕒 1 min read
देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने अनेक वाहन उत्पादकांनी विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन टू व्हीलर निर्माता कंपनी टीवीएस (TVS Motors) कंपनीच्या TVS Sports बाईक वर भरघोस सूट देत आहे. त्यामुळे तुम्हीही लवकरच नवीन बाईक घेणार असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही ऑफर आणि काय आहे या बाईकची खासियत.
या बाईक वर किती डिस्काउंट मिळणार आहे
या बाईकच्या खरेदीवर ग्राहक 8,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. तर त्यावर तुमहाल 2,100 रुपयांची निश्चित सूट मिळू शकते. ही ऑफर राज्यानुसार बदलू शकते. ही ऑफर फार कमी काळासाठी लागू आहे.
TVS Sport चे इंजिन
ही बाईक फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले 99.7 cc 4-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन वापरते, जे 7350 rpm वर 8.1 bhp ची मैक्सिमम पॉवर आणि 4500 rpm वर 8.7 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. यात 4-स्पीड, गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 74 किमी धावू शकते. या बाईकचा टॉप स्पीड 91kmph आहे.
TVS Sport चे फीचर्स
या बाईकला पुढच्या चाकाला 130 mm ड्रम ब्रेक आणि मागील बाजूस 110 mm ड्रम दिलेला आहे. तसेच CBS चे फीचर देखील या बाईकमध्ये दिसून आले आहे. यात 10 लिटरची फ्यूल टैंक आहे.
TVS Sport चे डायमेंशन
या बाइकचा ग्राउंड क्लीयरन्स 175 मिमी, रुंदी 705 मिमी, लांबी 1950 मिमी आणि उंची 1080 मिमी आहे, तर तिचा व्हीलबेस 1236 मिमी आहे.
TVS Sport ची किंमत
या बाईकच्या किक स्टार्ट अलॉय व्हील व्हेरिएंटची किंमत 64,050 रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि सेल्फ-स्टार्ट बटण व्हेरिएंट 67,543 रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ramdas Kadam | रामदास कदमांनी रश्मी ठाकरेंबद्दल केलेलं ‘ते’ विधान घेतलं मागे म्हणाले…
- Samsung Sale | सॅमसंग च्या सेलमध्ये ‘या’ स्मार्टफोन्सवर आहे मोठ्या प्रमाणात सूट,जाणून घ्या!
- Gautam Adani | गौतम अदानी यांचं नाव श्रीमंताच्या यादीतून घसरलं, ‘या’ क्रमांकावर आले अदानी
- Devendra Fadnavis | ‘तुमची शेवची निवडणूक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले…
- Devendra Fadnavis | “2019 ला मोदींच्या फोटोवर निवडून आले आणि नंतर…”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Health Tips | जमिनीवर झोपल्याने अनेक आजार बरे होऊ शकतात, जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
