🕒 1 min read
बुलढाणा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये काल शिंदे गटाचा ‘बाप चोरणारी टोळी’, असा उल्लेख केला. यावर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहेत आणि महापुरुष हे पुन्हा एकट्याचे नसून ते देशाचे असतात. अशा महापुरुषांचा आदर्श जोपासून त्यावर मार्गक्रमण करणे हे महत्त्वाचे असते, असे संजय गायकवाड म्हणाले.
“शिवसेना स्थापन करत असताना मी माझा हा बाळ देशाला अर्पण करत आहे, असा उल्लेख प्रबोधनकार ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे बाप कधीही चोरता येत नसतो हे सर्वांनी लक्षात ठेवावे”, असे प्रत्युत्तर आमदार गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे काल शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.
संध्याकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली. यासाठी शिवसेनेकडू्न जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी सुरवातीलाच बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, व्यासपीठावर आल्यानंतर आधी पाहिले आमचे वडील आहेत, का जागेवर ते पाहिलं. आतापर्यंत मुलं पळवणारे पाहिले होते. आता बाप पळवणारेही आल्याची जहरी टीका उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.
अमित शहांना आस्मान दाखवतो-
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पातशाह होते, आदिलशाह, निजामशाह होते. त्यांच्याच कुळातले शाह आत्ता काही दिवसांपूर्वी येऊन गेले. अमित शाह देशाचे गृहमंत्री ते काय म्हणाले की शिवसेनेला जमीन दाखवायची. आपल्याला जमीन दाखवायची आहे असं म्हणणाऱ्यांना आपण आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas Kadam | रामदास कदमांनी रश्मी ठाकरेंबद्दल केलेलं ‘ते’ विधान घेतलं मागे म्हणाले…
- Samsung Sale | सॅमसंग च्या सेलमध्ये ‘या’ स्मार्टफोन्सवर आहे मोठ्या प्रमाणात सूट,जाणून घ्या!
- Gautam Adani | गौतम अदानी यांचं नाव श्रीमंताच्या यादीतून घसरलं, ‘या’ क्रमांकावर आले अदानी
- Devendra Fadnavis | ‘तुमची शेवची निवडणूक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले…
- Devendra Fadnavis | “2019 ला मोदींच्या फोटोवर निवडून आले आणि नंतर…”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
