मुंबई – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मुश्रीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके कोणते उपचार सुरु आहेत याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. बॉम्बे हॉस्पिटलच्या बाराव्या मजल्यावर, डॉ. गौतम भंसाळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर 127 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. मुश्रीफ कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान, सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात येणार आहेत. त्यादिवशी ते मुश्रीफ यांनी उभारलेल्या सेनापती कापशी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला भेट देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वृत्ताला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही दुजारो दिला आहे. ते म्हणाले, ‘‘देशात कोणालाही कोठेही जायचा अधिकार आहे, त्याच पद्धतीने एखाद्याला अडवण्याचा अधिकारही लोकशाहीने दिलेला आहे. सोमय्या कोल्हापुरात येणार आहेत, हे नक्की आहे.’’
महत्त्वाच्या बातम्या
- सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार – पवार
- ‘भाजपात एकमेव मोदींचा चेहरा, बाकी सारे नाचरे मुखवटे’ शिवसेनेची टीका
- ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

