🕒 1 min read
पुणे: ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्याविरोधात साताऱ्यात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे दारू पिऊन नाचतात, असे वक्तव्य बंडातात्या यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले बघायला मिळत. तद्पश्चात आता बंडातात्यांनी माफी मागितली आहे.
कीर्तनकर बंडा तात्या म्हणाले होते, ‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात. आणि मी हे सिद्ध करू शकतो. माझं चालेंज आहे की सुप्रिया सुळेनीं मला खोट सिद्ध करून दाखवावं. त्या दारू पितात हे सिद्ध करण्यासाठी मला कोणत्या पुराव्यांची गरज नाही. त्याचे फोटो ढिगाने पडले आहेत. राजकारणात यायच्या अगोदर त्या रस्त्यावर दारू पिऊन पडलेल्या दिसायच्या.’ या विधानानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका केली होती.
या विधानाला प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांच्यावर हल्ला केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी वारकरी समाजातील स्त्रींयाना आव्हान केले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ‘वारकरी समाजात काही महिला सुद्धा आहेत, त्या महिलांना सुद्धा नक्की काहीतरी त्रास असणार आहे. स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या बंडातात्या कराडरांचा जर कोणत्या स्त्रीला काही त्रास असेल तर पुढे येऊन नक्की आम्हाला सांगावं. बंडातात्यांच वक्तव्य म्हणजे कर्तुत्ववान महिलांचा अपमान आहे, या प्रकारच्या विधानांमुळे समाजात अपप्रवृतींचा प्रसार होतो. आम्हाला ते नकोय.’
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
