Share

“बंडातात्यांनी दारू पिऊन आंदोलन केलं”; रुपाली पाटलांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

पुणे: किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयावरून सध्या राज्यात मोठे वाद आणि राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कीर्तनकर बंडा तात्या कराडकर यांनी नवीन वादाला सुरुवात केली होती. राज्यातील महिला नेत्यांबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याला प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांच्यावर हल्ला केला आहे. त्या आज पुण्यात कीर्तनकार बंडा तात्या कराडकरांच्या पुतळ्याला जोडोमार आंदोलन करणार आहेत.

कीर्तनकर बंडा तात्या म्हणाले होते, ‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात. मी हे सिद्ध करू शकतो. माझं चालेंज आहे की सुप्रिया सुळेनीं मला खोट सिद्ध करून दाखवावं. त्या दारू पितात हे सिद्ध करण्यासाठी मला कोणत्या पुराव्यांची गरज नाही. त्याचे फोटो ढिगाने पडले आहेत. राजकारणात यायच्या अगोदर त्या रस्त्यावर दारू पिऊन पडलेल्या दिसायच्या.’ या विधानामुळे त्यांची सर्वत्र मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. त्यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे.

त्या विधानावर रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, ‘बंडा तात्यांच वक्तव्य म्हणजे कर्तुत्ववान महिलांचा अपमान आहे, या प्रकारच्या विधानांमुळे समाजात अपप्रवृतींचा प्रसार होतो. आम्हाला ते नकोय. आज सुप्रिया सुळे या संसदरत्न आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्यात जास्त प्रश्न विचारणाऱ्या खासदार आहेत. त्या विकासाच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारणाऱ्या खासदार आहेत. मी बंडातात्यांविरोधात पोलीस तक्रार करणार आहे आणि जर योग्य कारवाई केली गेली नाही, तर मी कोर्टात जाईल. त्यांनी जे वक्तव्य केलं ते अनेक महिलांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांनी केलेल्या आरोपांचा पुरावा द्यावा. माझाही आरोप आहे की काल बंडातात्यांनी दारू पिऊन आंदोलन केलं, त्यांना पुरावे द्यायला ते कोण आहेत, वैयक्तिक पातळीवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. ते वारकरी संप्रदायाला लागलेला काळा डाग आहेत, त्या समाजाला महाराष्ट्र मानतो. हा समाज महिलांबद्दल असे बोलत नाही. त्यांच्यावर crpc (फौजदारी प्रक्रिया संहिता) नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याशिवाय अशी प्रवृत्ती जाणार नाही. समाजाला विचार देणारी लोक जर असं बोलायला लागली तर इतर लोक त्याचा जास्त गैरफायदा घेतात. आम्ही महिला काही बेवारस नाही. कोणीही महिलांबद्दल असे विकृत बोलले नाही पाहिजे, मग ती स्त्री कुठलीही असो.’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!