🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) यांनी आज(४ फेब्रु.)पत्रकारांशी संवाद साधताना मुंबईतीत ३ टक्के घटस्पोट वाहतूक कोंडीमुळे होतात, असा अनोखा दावा केला आहे. यावरच शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे (Shiv Sena leader Manisha Kayande) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
“मामींचा नवा शोध, मुंबईतील ट्राफिकमुळे 3 टक्के घटस्फोट होतात. उत्तनच्या म्हाळगी प्रबोधिनीत भाजप कसले बौद्धिक घेते? कधी तरी मामीलाही बोलवा.”, असे ट्वीट करत मनीषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.
मामींचा नवा शोध : मुंबईतील ट्राफिकमुळे 3 टक्के डीवोर्स (घटस्फोट) होतात. उत्तनच्या म्हाळगी प्रबोधिनीत भाजप कसले बौद्धिक घेते? कधी तरी मामीलाही बोलवा.#AmrutaFadnavis #BJP #Shivsena @fadnavis_amruta @ShivsenaComms @AUThackeray #Mumbai #Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/IrWW4GMWrE
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) February 4, 2022
काय आहे म्हाळगी प्रबोधिनी?
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही भाजपची पितृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्था आहे. याठिकाणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच या ठिकाणी भाजप नेत्यांना ही मोफत प्रशिक्षण दिले जाते. याठिकाणी माहिती अधिकार व विधीमंडळातील प्रश्न हाताळणे, निर्णय क्षमता व नेतृत्व विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन व टीमवर्क, प्रशासन कुशलता, परस्पर संवाद कौशल्य या विषयांवर प्रशिक्षण दिले जाते. सध्या या प्रबोधिनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- आयपीएल मेगा ऑक्शनसाठी दिग्गजाने सोडले पाकिस्तान सुपर लीग
- “पंकजा आणि सुप्रियाताई या दोन्ही नेत्या निर्व्यसनी”, बंडातात्यांनी मागितली माफी
- ‘त्या’ घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक; आवश्यक मदत करण्याचे यंत्रणांना निर्देश
- रोहित शर्मा बरोबर सलामीला कोण ?
- शिवसेनेच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच मुंबई मनपाचा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
