मुंबई : ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून करिअरची सुरुवात करणाऱ्या आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर रिलीज (Trailer) केला आहे, त्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Producer director Sanjay Leela Bhansali) यांच्या या चित्रपटात आलिया भट्टसोबत अजय देवगण (Ajay Devgan) देखील दिसणार आहे. या चित्रपटात त्याने मुंबईचा डॉन करीम लाला (Mumbai don Karim Lala) यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट हिट ठरणार असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारीला रिलीज होणार संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट अनेकदा रिलीजची तारीख लांबणीवर टाकल्यानंतर अखेर या महिन्यात २५ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. हा चित्रपट गंगूबाई काठियावाडी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या कथेवर आधारित आहे. हे पुस्तक हुसैन झैदी यांनी लिहिले आहे.
विशेषतः स्त्री शक्तीवर आधारित असलेला चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर पाहून आलिया भट्टच्या करिअरचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे दिसतंय. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात तिची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. संजय लीला भन्साळीच्या प्रत्येक चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही जबरदस्त असणार आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा ट्रेलरही धमाकेदार आहे, जो पाहिल्यानंतर उत्सुकता नक्कीच वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
संसदेतही पवार-विखे वादाचे पडसाद; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खाल्ल्या मिठाला जागावं…”
-
‘बंडातात्या कराडकर जे म्हटले ते…’; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
-
राज्यातील निर्बंध वाढणार की कमी होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
-
शिवसेनेच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच मुंबई मनपाचा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार

