पुणे : कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वरदान ठरत आहे. पण इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने यावरून राज्यात चांगलाच वाद झाला होता. रेमडेसिवीरच्या साठ्यावरून भाजपवर टीका होत असतानाच अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी मात्र आपल्या जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या रेमडेसिवीर आणले आहेत. दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी अहमदनगरसाठी खासगी विमानाने इंजेक्शन्स आणली. तो सर्व साठा संपल्यानंतर त्यांनी स्वत: फेसबूकवर व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. विखे यांनी शिर्डी विमानतळावर दिल्लीहून ही इंजेक्शन्स आणली होती. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी संस्थान, प्रवरा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयास ती मोफत देण्यात आली. पण त्याचवेळी मुंबईत भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गुजरातमधून आणलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून वाद सुरू होता. त्यामुळे त्यावेळी विखे यांनी आपण कोठून आणि नेमकी किती इंजेक्शन्स आणली हे सांगणे टाळले होते.
मात्र आता सुजय विखे यांनी नक्की रेमडेसिव्हिर आणले की नाहीत यावरून वाद सुरु झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ‘त्या’ बॉक्स मध्ये नक्की काय होत असा सवाल उपस्थित केला आहे. ‘खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी’. असा घणाघात चाकणकर यांनी केला आहे.
खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे.
एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे.1/2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 25, 2021
एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 25, 2021
महत्वाच्या बातम्या
- परभणीत खासगी डॉक्टर्स कोविड रुग्णांच्या सेवेत दाखल, औषधोपचार होणार गतीने
- खाकीतल्या माणसाचा प्रामाणिकपणा; सापडलेलं सोनं केलं परत
- पाच लाखासाठी विवाहितेचा छळ
- ऑक्सिजन निर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्य सरकारने गायब केला; भाजपचा गंभीर आरोप
- सख्या मोठ्या भावाला फायटरने मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

