बीड: आजकाल आपण म्हणतो की प्रामाणिकपणा फक्त पुस्तकातच वाचायला मिळतो, मात्र याला खोटं ठरवलं आहे केज ठाण्यातील एका पोलिसाने आणि पुन्हा एकदा प्रामाणिकपणा जीवंत असल्याचे दाखवून दिले. सध्याची परिस्थिति अशी झाली आहे की कोणाचीही नजर फिरू शकते, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत तसेच अनेक सामान्य तसेच गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत चोरीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
तांबवा येथील एक व्यक्ती लग्न कार्यासाठी सराफाकडून दागिने बनवण्यासाठी ५० हजार रुपये किमतीचे सोनं कागदाच्या पुडीत गुंडाळून ती पुडी खिशात घालून केजला आला होता. त्याने पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर खिशातील मास्क काढून तोंडाला लावत पुढे निघून गेला. खिशातून मास्क काढत असताना सोनं असलेली पुडी नकळत खाली पडली. याचवेळी तेथून केज ठाण्यातील पोलिस नाईक उमेश आघाव हे ठाण्याकडे जात होते व त्यांना वाटेत ती सोनं असलेली पुडी सापडली आणि ती घेऊन ते पोलिस ठाण्यात गेले. काही वेळात तो व्यक्ती सोन्याची पुडी हरवल्याची तक्रार देण्यासाठी ठाण्यात आला. तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिस नाईक आघाव यांची ठाणे अंमलदार म्हणून ड्युटी होती.
सोनं हरवल्याची व्यथा मांडून, ‘साहेब लवकर तपास करा’ म्हणत तो रडू लागला. त्यानंतर पोलिस नाईक यांनी त्याची चौकशी करून त्याची ओळख पटवली. खात्री पटताच त्यांनी पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना कल्पना देऊन त्या व्यक्तीस ती सोन्याची पुडी त्याच्या स्वाधीन करत प्रामाणिकपणा दाखवून दिला. या वेळी पोलिस निरीक्षक त्रिभुवन तसेच पोलिस ठाण्यातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ऑक्सिजन निर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्य सरकारने गायब केला; भाजपचा गंभीर आरोप
- सख्या मोठ्या भावाला फायटरने मारहाण
- बीड शहरातील वेल्डिंग शॉपवरून ऑक्सीजनच्या टाक्या जमा
- मोठी बातमी : भाजपच्या बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन
- आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार जमा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

