परभणी : शहरासह जिल्ह्यातील शासकीय कोविड सेंटरवर खासगी डॉक्टरांची मोठी टीम रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहे. सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टर तसेच नर्सेसची कमतरता भासत असल्याने रुग्णालयातील रुग्ण सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सर्व प्रकारची दक्षता घेवून खासगी रुग्णालयातील डॉक्टर रुग्ण सेवेमध्ये दाखल झाले आहे.
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच आयटीआय, जिल्हा परिषद नूतन इमारतीसह अन्य शासकीय कोविड सेंटरमधील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेवून खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहूल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी खासगी डॉक्टरां बरोबर आयोजीत केलेल्या बैठकांमधून वैद्यकीय सेवा उपलब्ध करा, असे आवाहन केले होते. खासदार जाधव यांनी या आपत्तकालिन स्थितीत या जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करावी, मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे शहरातील विविध विषयातील खासगी डॉक्टर्स मंडळींनी शासकीय रुग्णालयामधून काही तास पुरवण्याबाबत नियोजन केले आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील मनुष्यबळावरील ताण आता काही प्रमाणात हलका होणार आहे.
जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधी तसेच रुग्णालयाबरोबर चर्चा करीत या कामाला अंतिम स्वरूप देण्यात आले. या पाठोपाठ चार डॉक्टरांच्या एका टीमने अशा आठ एकूण टीमने दररोज चार तास सेवा देण्याचा संकल्प केला आहे. त्याप्रमाणे खासगी डॉक्टर्स तसेच शासकीय कोविड सेंटरमधून रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासह अन्य कोविड सेंटरमधील रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. रुग्णांवर तत्काळ उपचार करणे, ऑक्सिजन, औषधोपचार करणे देखील आता मनुष्यबळाची कमतरता दुर झाल्याने लवकरात लवकर रुग्णांना दाखल करुन घेणे. उपचारासाठी लागणारे नियाेजन देखील या माध्यमातून करण्यात येणार आहे.
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

