मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून राज्य सरकारने स्वतः ऑक्सिजन निर्मितीची वाढ करण्यासह केंद्राकडे मदत मागितली आहे. केंद्र सरकारने राज्यासाठी मोठी मदत उपलब्ध करून दिली आहे.
अशातच, ‘महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला नसता,’ असा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे.
यासोबतच, ‘केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा,’ अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ‘ कोरोना महामारीच्या काळात कोणत्याच राज्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये, प्रत्येक राज्य या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2021 मध्ये राज्य सरकारांना पत्रे पाठवली होती. त्यानुसार ‘पीएम केअर’ निधीतून महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला. मात्र, गेल्या 4-5 महिन्यात या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरु केला नाही.’ असं भाष्य प्रसाद लाड यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

