पुणे : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात वॅक्सिन कमी असताना बाहेरील देशात लसींची मोठ्या प्रमाणात निर्यात केली गेल्यामुळेच देशात तुटवडा झाल्याची टीका काँग्रेससह राष्ट्रवादीने केली आहे. आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
घरात नाही दाणा पण मला "वॅक्सिन गुरू" म्हणा…
भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल.#vaccine @PMOIndia pic.twitter.com/60FTKjJUCU— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 17, 2021
‘घरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा… भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल,’ असा घणाघात रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवस विशेष ‘अग्निहोत्र’ मधील ‘मंजुळा’ ते ‘बंदीशाळा’तील ‘जेलर’ मुक्ता बर्वेचा थक्क करणारा प्रवास
- उस्मानाबादेत ऑक्सिजन पुरवठा होतोय सुरळीत
- ‘अजितदादा मंत्रालयात आले, आता मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार ?’
- कोरोना संसर्ग, मृत्यू टाळण्यासाठी प्लाझ्मा थेरपी लाभदायक नाही; आयसीएमआरचे मत
- कळमनुरी : राजीव सातव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


