Share

वाढदिवस विशेष ‘अग्निहोत्र’ मधील ‘मंजुळा’ ते ‘बंदीशाळा’तील ‘जेलर’ मुक्ता बर्वेचा थक्क करणारा प्रवास

Published On: 

मुंबई : गेल्या काही वर्षात आपल्या अभिनयाद्वारे मराठी मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे ओळखली जाते. विविध मालिका आणि चित्रपटाद्वारे आपल्या दर्जेदार भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनात तिने घर केले आहे. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रंगभुमीवर पदार्पणातच मुक्ताने दुहेरी भूमिका साकारली होती. यानंतर नाटकाची ओढ काही थांबली नाही. पुढे नाट्यशास्त्रातील पदवी घेत मुंबईला आली.

१९९८ ते २००३ काळात तिने अनेक मालिकेत छोट्या भूमिका साकारल्या. १९९८ साली आलेल्या ‘घडलयं बिघडलयं’ या मालिकेतुन तिने दुरचित्रवाणी क्षेत्रात पदार्पण केले. तर २००४ साली ‘चकवा’ चित्रपटाद्वारे तिने चित्रपट सृष्टीत तिने पाउल ठेवले. पदार्पनातच तिने राज्य शासनाचा पुरस्कार पटकावला. नंतर २००६ साली आलेल्या ‘हम तो तेरे आशिक है’ या व्यावसायिक नाटकासाठी मुक्ताला महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र मुक्ता प्रकाशझोतात आली ती २००९ साली जोगवा या चित्रपटातुन तिने सर्वांचे लक्ष वेधले. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार तर मुक्ताला महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

यानंतर २००९ साली आलेल्या ‘अग्निहोत्र’ या मालिकेतील मंजुळाच्या भूमिकेने ती घराघरात पोहोचली. या मालिकेत इतर दिग्गज कलाकारांची फौज असताना या मुक्ताने स्वत:ची वेगळीच छाप सोडली. यानंतर याच मालिकेचा दिग्दर्शक सतिश राजवाडेने मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटात तिला मुख्य भूमिका दिली. या चित्रपटाची लोकप्रियता आजही अबाधीत आहे. या चित्रपटाच्या माध्यामातुन स्वप्निल-मुक्ता ही नविन जोडी मराठी प्रेक्षकांना मिळाली. यांनतर दोघांनी सतिश राजवाडे दिंग्दर्शीत ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ एकत्र काम केले. तेव्हा प्रेक्षक राधाच्या प्रेमात पडले. या मालिकेला झी मराठीने सुवर्णपानाचा दर्जा दिला आहे. मुक्ता बर्वे हे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले एक गोड स्वप्न आहे. आपल्या सक्षम अभिनयाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मुक्ताला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!