Share

‘अजितदादा मंत्रालयात आले, आता मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार ?’

Published On: 

मुंबई : राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली.

दरम्यान, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयाऐवजी मातोश्रीतुनच कारभार हाकत असल्याने जनता संकटात असताना मुख्यमंत्री घरात अशी टीका भाजपने केली होती.

आता कोरोनाच संकट पुन्हा एकदा वाढलं असतानाच ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. असं असताना देखील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी वा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मंत्रालयात येत नसल्याने भाजपने पुन्हा एकदा खोचक प्रहार केला आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी… त्यातच कोरोनाचे संकट, मुख्यमंत्री घरात बसलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पहाणी तरी केली पण..मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना वर्क फ्रॉम होम करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतक मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार? महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिटविला. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे,’ असं आव्हान देखील केशव उपाध्ये यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!