🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पण तरी कोरोना संसर्गाचे गांभीर्य कमी करणे किंवा मृत्यू टाळण्यासाठी ही थेरपी फार लाभदायक ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना उपचारांतील वैद्यकीय निर्देशांतून ही थेरपी काढून टाकली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले आहे.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय कृतिदलाच्या बैठकीत सर्वच सदस्यांनी यावर सहमती दर्शवली आहे. या सदस्यांच्या मते, वयस्कर रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जात असताना प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याचे उपचारांतील निर्देश काढून टाकले पाहिजेत. कोणत्याही दृष्टीने प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरू शकलेली नाही. शिवाय, अनेक प्रकरणांत या थेरपीचा चुकीचा वापर केला गेला आहे.
सूत्रांनुसार, आयसीएमआर लवकरच याबाबतचे नवे निर्देश काढेल. सध्याच्या निर्देशांनुसार, लक्षणे सुरू झाल्यानंतर सात दिवसांच्या आत आजार मध्यम स्वरूपात असेल तर या प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गंभीर रुग्णांच्या रक्तामध्ये अँटिबॉडीज वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. पूर्वीच्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे देशभरात प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता.
काही डॉक्टर व शास्त्रज्ञांनी याबाबत प्रमुख शास्त्रज्ञ-सल्लागार के. विजय राघवन यांना पत्र पाठवून प्लाझ्मा थेरपी अतार्किक असल्याचे म्हटले होते. शिवाय, याचा शास्त्रशुद्ध वापर होत नसल्याने इशाराही दिला होता. हे पत्र आता आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव व एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रावर व्हॅक्सिनोलॉजिस्ट गगनदीप कंग, सर्जन प्रमेश सीएस आणि इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- धोनीच्या अंदाजात हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तोडंघशी पडला फलंदाज
- ‘बॉल टेम्परिंग बद्दल गोलंदाजांना माहित होते’ ; बॅनक्रॉफ्टच्या विधानावर माजी ऑस्ट्रेलियन कर्णधारचा धक्कादायक खुलासा
- करण जोहरच्या मुलांनी केली पावसाळ्याची तयारी; सोशल मिडियावर पोस्ट केला फोटो
- उस्मानाबादेत ऑक्सिजन पुरवठा होतोय सुरळीत
- ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटामुळे संजय लीला भन्साळी यांना दिवसाला ३ लाख रुपयांचा होतोय तोटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
