उस्मानाबाद: जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता, मात्र आता पुन्हा गाडी रुळावर येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत होता तसेच ऑक्सिजन बेडची सुद्धा कमतरता भासत होती. आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळत होतं, त्यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होत होती. आता सरासरी १६ मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे व त्याच प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. वेळेवर रुग्ण उपचारासाठी येत नसल्याने त्यांना शेवटी ऑक्सिजनवरच उपचार करावे लागत असल्याने ही ऑक्सिजनची टंचाई जाणवत होती. असे ऑक्सिजनची मागणी असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाले. परिणामी ऑक्सिजन व्यवस्था असलेले बेडही अनेकांना उपलब्ध झाले नाही. परिणामी अनेकांना जीव गमावण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढली होती. मात्र, पुरवठा अत्यंत कमी होत होता. तरीही प्रशासनाने समतोलप्रमाणात सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनला पुरवठा करण्याची कसरत केली. बहुतांशवेळा यश आले. अनेकवेळा मोठा त्रासही सहन करावा लागला. आता लिक्विड फॉर्ममध्ये ऑक्सिजन सुरळीत उपलब्ध होत आहे. यामुळे वायुस्वरुपात ऑक्सिजन सुरळीत उपलब्ध होत आहे.
बहुतांशवेळी खासगी रुग्णालयांकडून व्यवस्थित व्यवस्थापन केले जात नाही. आवश्यकता नसताना पुढील विचार करून अधिक मागणी नोंदवली जाते. यावेळी जेथे आवश्यकता असते तेथे ऑक्सिजन उपलब्ध हेात नाही. यामुळे ऑक्सिजन टंचाईचे चित्र निर्माण होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आता रेमडेसिविर इंजेक्शनप्रमाणे ऑक्सिजनचे व्यवस्थापन करून आवश्यक ठिकाणी पुरवठा करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी माझा संसदेतील मित्र गमावला’, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
- ‘एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त!’, शरद पवारांच्या शोकभावना
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘मी माझ्या मित्राला गमावले’, राहुल गांधींना दु:ख अनावर
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

