कळमनुरी : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांच्यावर हिंगोलीतील कळमनुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजीव सातव यांना त्यांचा मुलगा पुष्कराज याने मुखाग्नी दिला. यावेळी अंत्यसंस्कारांपूर्वी कळमनुरी येथे उपस्थित नेतेमंडळींनी सातव यांना आदरांजली वाहिली. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबतच इतरही मोठ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हजेरी कळमनुरी येथे पाहायला मिळाली.
दरम्यान, काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव हे कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपासून आजारी होते. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने प्रकृती पुन्हा खालवली होती. न्यूमोनियासोबतच त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. मागील २३ दिवसांपासून राजीव सातव आजाराशी लढत होते. पण रविवारी त्यांची झुंज संपली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संपूर्ण देश एकजूट आहे,किती लोकांना मोदीजी अटक करणार ते बघुयाच’
- ‘दादा! बहुजनांचे हक्क आणि अधिकार हे तुम्हाला बारामतीची जहागिर वाटतात का?’
- ‘दिलेले वचन केले पूर्ण’, ट्विंकल खन्नाने दिल्ली आणि पंजाबमध्ये पाठवले ऑक्सिजन कंसंट्रेटर
- तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा,अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणची कसरत
- #तोक्ते चक्रीवादळाचा कोल्हापूरलाही फटका; घरांसह शाळांचे छत उडाले, लाखोंच नुकसान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

