पंढरपूर: सध्या राज्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्यातील वाद चव्हाट्यावर येत आहे. दोन्ही नेत्यांकडून अपशब्द वापरली जाणारी भाषा वापरली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संस्कृतीचा अपमान केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. यावरच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Women Commission chairperson Rupali Chakankar) यांनी चांगलेच सुनावले आहे.
“राजकीय पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असतात. त्यावर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे. मात्र एक ठराविक पातळी सोडून कुणीही भाष्य करू नये.”, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याबाबत महिला आयोगाकडे तक्रार करणार होते, त्यावर प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “चंद्रकांत दादांना तक्रार दाखल करू द्या, त्याची नक्कीच दखल घेतली जाईल.”
दरम्यान काल (२० फेब्रुवारी) संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याबाबत अपशब्द काढले होते. आपल्या वक्तव्याबाबतच आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्प्ष्टीकरण देत म्हटले की, “जे महाराष्ट्र द्रोही आहेत, जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं असं आमचे संत सांगून गेले आहेत.”
महत्वाच्या बातम्या:
- “त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही”, चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- “बीसीसीआयने याबाबत कारवाई करावी’ ; रवी शास्त्रींचा साहाला पाठींबा
- उदयनराजेंचा स्वॅग! बैलगाडा शर्यतीत जोरदार एन्ट्रीने केले सर्वांनाच घायाळ
- ‘वक्तव्याचा विपर्यास करणारे म्हणजे नाक खाजे अन् नक्टी खिजे’ – गुलाबराव पाटील
- साहाने केलेल्या आरोपांवर द्रविडने दिली प्रतिक्रिया म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

