सातारा: खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. साताऱ्यात देगाव येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात खासदार उदयनराजेंनी चक्क बैलगाडीतून या कर्यक्रमात एन्ट्री (Udayan Raje strong entry in bullock cart race) घेत सर्वांनाच घायाळ केले.
डोक्यावर फेटा,गळ्यात फड्या आणि हातात वेसण घेऊन छत्रपती उदयनराजेंनी बैलगाडी हाकली. यावेळी त्यांचा स्वॅग सर्वांनाच घायाळ करून गेला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, “मी एक शेतकरीच आहे. माझ्या इलेक्शनच्या प्रतिज्ञापत्रात पहा. तसेच मी मोठ्या गाडीतून फिरतो तर या शेतकऱ्यांनी मोठ्या गाडीतून फिरल तर काय बिघडलं. मोठ्या लोकांना सबसिडी दिली जाते शेतकऱ्यांना सबसिडी दिली जात नाही. या शेतकरीवर्गाचे भवितव्य उज्ज्वल झालं पाहिजे असं मला वाटतं.”
तसेच “मी राजकारणात असलो तरी समाजकारण करत असतो. मला काही घेणे देणे नाही उद्या म्हणलं तरी राजीनामा देतो. पण एका अटीवर या लोकांचं काही तरी कौतुक व्हावे. या शेतकरी वर्गाला पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने या शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे.”, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “ड्रेस कोडबाबत घटनेत किंवा कायद्यात कोणतीही तरतूद नाही”, हिजाब वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
- भाजपविरोधात आघाडीला वेग; के चंद्रशेखर रावांनी घेतली शरद पवारांची भेट
- बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांच्या शक्ती प्रदर्शनाला योगेश क्षीरसागर यांचे प्रत्युत्तर; राजकीय रिंगणात भाऊ-भाऊ आमने-सामने
- साहाच्या निवडप्रकरणी गांगुलीनंतर आता राहुल द्रविड वादाच्या भोवऱ्यात
- “शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने…”,संजय राऊतांचे कॉंग्रेस आघाडीबाबत मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

