Share

साहाने केलेल्या आरोपांवर द्रविडने दिली प्रतिक्रिया म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रिद्धिमान साहाला श्रीलंकेच्या भारत दौऱ्यात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या संघात जागा मिळाली नाहीये. रिद्धिमान साहाने याप्रकरणी अनेक मोठे खुलासे केले आहेत. यात त्याने राहुल द्रविडवरही आरोप केला होता. यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

रिद्धिमान साहाला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघात जागा दिली गेली नव्हती. त्यानंतर त्याला द्रविडने निवृत्तीचा विचार करावयाला सांगितल्याचा आरोप साहाने केला होता. याबाबत द्रविडने (rahul dravid) स्पष्टीकरण देत सांगितले “मी अजिबात दुखावलेलो नाहीये. मला रिद्धी आणि त्याच्या भारतीय क्रिकेटमधील कामगिरी आणि योगदानाबद्दल खूप आदर आहे. माझे वक्तव्य त्या ठिकाणाहून आले आहे. मला वाटते की तो प्रामाणिकपणा आणि स्पष्टतेला पात्र होता,” राहुल द्रविडने सांगितले.

द्रविडने यावेळी रिद्धिमान साहाची परिस्थिती समजून पुढे सांगितले “प्रत्येक प्लेइंग इलेव्हन निवडण्याआधी याबाबत बोलण्यावर माझा नेहमीच विश्वास आहे आणि ते का खेळत नाहीत यासारख्या प्रश्नांसाठी खुला देखील आहे. खेळाडूंना अशा वेळी अस्वस्थ वाटणे आणि त्यांना दुःख होणे स्वाभाविक आहे. मी रिद्धीला फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की पंतने स्वतःला आमचा नंबर १ खेळाडू म्हणून स्थान निश्चित केले आहे. आम्ही एक तरुण यष्टीरक्षक (केएस भरत) तयार करण्याचा विचार करत आहोत. यामुळे माझ्यात रिद्धीबद्दलच्या भावना किंवा आदरात कधीही बदल होणार नाही.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!