Share

“त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही”, चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Published On: 

औरंगाबाद:  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K. Chandrashekhar Rao) यांनी काल (२० फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. आमच्या भेटीचे चांगले परिणाम लवकरच दिसतील, असे संकेतही राव यांनी दिले. दरम्यान के. चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौऱ्यानंतर अनेक राजकीय चर्चा रंगत आहेत. आता यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांची पत्रकार परिषद मी ऐकली नाही. पण एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन दुसऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं ही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना ते मलाही भेटले होते. त्यामुळे मला यात काही फार महत्त्वाचे वाटत नाही. या सर्वांनी मागच्या लोकसभेत हातात हात घालून मोठी आघाडी केली होती. त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे कालच्या त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. खरे तर आता तेलंगणात टीआरएसची अवस्था वाईट आहे. मागच्या लोकसभेत तेलंगणात भाजपच्या चार जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे पुढच्यावेळी येथे भाजपच नंबर वन असेल”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. रोज काय होत आहे.ते सर्वजण उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलाबाबत काय झालं, सोमय्यांचा कशा पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला हे सर्व जण बघत आहेत.त्यामुळे मविआ सरकार राज्यात सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!