Share

‘वक्तव्याचा विपर्यास करणारे म्हणजे नाक खाजे अन् नक्टी खिजे’ – गुलाबराव पाटील

Published On: 

जळगाव: मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांच्यातील शाब्दिक संघर्ष चांगलाच पेटला आहे. एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना चोरो को सारे चोर नजर आते हें, असे प्रत्युत्तर दिल्यानंतर आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाक खाजे अन् नक्टी खिजे, असा टोला नाव न घेता एकनाथ खडसेंना लगावला आहे.

खानदेशातील पहिले लोककला वहीगायन संमेलनाला मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन व एकनाथराव खडसे असे दोन डाकू आहेत, असे मी बोललो होतो. डाकू म्हणजे बंदुका घेऊन निघालेले डाकू नाही, असे स्पष्टीकरण देत नाक खाजे अन् नकटी खिजे यांना दुसरा धंदा काय, असा जोरदार टोला पुन्हा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथराव खडसे यांना हाणला आहे. यावेळी महाजन व खडसे या माजी मंत्र्यांना डाकू हा शब्द संबोधित करून मंत्री पाटील यांनी पळ काढला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!