Share

‘बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले’

Published On: 

पुणे : पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस खूप वादळी ठरले. अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी सुद्धा भाजपच्या आमदारांनी तुफान राडा घातला. विधानभवनाच्या बाहेर भाजपकडून आंदोलन केले. तर दुसरीकडे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील राजदंड पळवून नेल्याचा प्रकार घडला. भाजपचे आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना बडनेराचे आमदार रवी राणा यांनी सभागृहात काळा बोर्ड घेऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर राजदंड घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

या सगळ्यावरून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रवी राणा आणि त्यांच्या पत्नी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले’ असा घणाघात रुपाली चाकणकर यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने नाविनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्यानंतर सर्वोच्च नायालयाने मुंबई उच्च न्याय्लायाच्या निर्णयाला स्थगित देत राणा यांना दिलासा दिला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!