Share

‘आनंदीबाईनी राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच बेताल बोलण्याला लगाम घालावा’

Published On: 

मुंबई : राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. तर, काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर ठाकरे-कोश्यारी वादात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. “वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!” असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला ट्वीट करून लगावला आहे.

अमृता फडणवीस यांच्या याच ट्वीटला रुपाली चाकणकर यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरुन देखील अमृता फडणवीस यांना टोमणा लगावला आहे.रुपाली चाकणकर म्हणाल्या,’राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या ‘Dicey Creature’ ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही. त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

दरम्यान, शिवसेना महिला आघाडीने देखील अमृता फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर देत खुलं आव्हान दिलं आहे. ‘नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकारणाशी संबंध आलेल्या अमृता फडणवीसांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनेची ही चौथी पिढी आहे जी हिंदुत्वावादी आहे. आमदार, खासदार, नगरसेवक वा प्रवक्त्या असत्या तर आम्ही ऐकून घेतलं असतं. आमचं तोंड त्यांनी उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. मात्र आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही. जर बोलायचंच असेल तर आमच्या समोर येऊन बोलावं,’ असं खुलं आव्हान शिवसेना महिला आघाडी तर्फे नेत्या विशाखा राऊत यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!