औरंगाबाद : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. यातच आता मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी काल सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. मराठा आरक्षणावर न्यायालयाने स्थगिती दिली, पण न्यायालयाने स्पष्ट केले होते की, आजपर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये आणि अॅडमिशन प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही. हा निर्णय लागून एक महिना झालेला आहे. परंतु राज्य सरकारने अद्याप मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत. यासंदर्भात ज्या वेळेस विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ राज्य सरकारला भेटायला जातं, तेव्हा राज्य सरकार स्पष्टपणे चुकीचा सल्ला देतं. ते विद्यार्थ्यांना सांगतात की, या ऑर्डरचे स्पष्टीकरण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावे. विनोद पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत यासंदर्भातील नाराजी व्यक्त केली आहे.
विनोद पाटील यांची फेसबुक पोस्ट
मराठा आरक्षणावर न्यायालयाने स्थगिती दिली पण न्यायालयाने स्पष्ट केले होते की आजपर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये व ऍडमिशन प्रोसेस मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही. हा निर्णय लागून एक महिना झालेला आहे परंतु राज्य सरकारने अद्यापपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांन्या नियुक्त्या दिलेल्या नाहीत. यासंदर्भात ज्या वेळेस विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ राज्य सरकारला भेटायला जातात तेव्हा राज्य सरकार स्पष्टपणे चुकीचा सल्ला देऊन विद्यार्थ्यांना सांगते आहे की या ऑर्डर चे स्पष्टीकरण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावे.
माझे म्हणणे आहे की, एकही विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा संबंधच येत नाही. सरकारला जर वाटत असेल की नियुक्त्या दिल्या तर त्यात कोर्टाचा अवमान होईल, तर सरकारने स्वतः ‘क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर्स’ घ्यावेत, विद्यार्थ्यांना तेथे पाठवू नये. अन्यथा हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाऊन अजून विलंब लागेल. त्यामुळे अधिक विस्कळीत परिस्थिती निर्माण होऊन माझ्या मराठा समाज बांधवांचे अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत वाया जातील.
त्यामुळे राज्य सरकारने स्वतःवरील जबाबदारी झटकून विद्यार्थ्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला न देता, 2014 ते 2020 दरम्यान झालेल्या सर्व भरती प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्तीपत्र देऊन न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे, एवढीच आमची रास्त मागणी आहे. – विनोद पाटील
महत्वाच्या बातम्या-
- भारत आणि चीन सीमाभागातील शांतता सुरक्षित राखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणार
- विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठीही होणार ठाकरे-कोश्यारी संघर्ष ?
- मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट? राऊत यांच्या ट्वीटने खळबळ
- वाढीव वीजबिलासंदर्भात दिलासा देण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
- महाराष्ट्रासह वीस राज्यांना खुल्या बाजारातून 68,825 कोटी रुपये कर्ज घेण्याची परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

