मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था कमी पडत असल्याने कोरोने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर, महाराष्ट्रापाठोपाठ इतर राज्यांमध्ये कोरोना वेगाने पसरत आहे. काही राज्यांमधील निवडणुका, धार्मिक कार्यक्रम यामुळे संसर्गाचे प्रमाण अधिक वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने खबरदारीचे पाऊल उचललं आहे. . महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडला ‘उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राज्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता असेल.
यासोबतच, जे प्रवाशी 48 तासाच्या आतील RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणणार नसतील त्यांची रेल्वे प्लॅटफॉर्मवरच अँटीजेन चाचणी करण्याचे आदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले आहेत. ज्या प्रवाशांची RTPCR चाचणी निगेटीव्ह आली असेल त्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने अधिसूचना काढत जाहीर केले आहे.
रेल्वेने या 6 संवेदनशील राज्यातून महाराष्ट्रात निघणाऱ्या एक्स्प्रेसची आणि त्यातल्या प्रवाशांची सर्व माहिती 4 तास आधी राज्य सरकारला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासी महाराष्ट्रातील कुठल्या रेल्वे स्थानकावर उतरणार याचीही माहिती रेल्वेने राज्य सरकारला द्यायची आहे. यामुळे राज्य सरकार आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिक खबरदारी घेत असून रविवारी (18 एप्रिल) याबाबत राज्य सरकारकडून एसओपी जारी करण्यात आल्या आहेत.
- “स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं तर हे ‘येड#$%’ सरकार आहे”; नितेश राणेंचा टोला
- ‘अरे जनाबसैनिका, मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात’
- ३० एप्रिल नंतर लस न घेणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर फिरू देणार नाही- आस्तिककुमार पांडे
- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनासह सारीचा कहर; रुग्णालये खचाखच!
- इंग्लंडला जाण्याआधी राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्सला दिला भावुक निरोप !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

