Share

३० एप्रिल नंतर लस न घेणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर फिरू देणार नाही- आस्तिककुमार पांडे

Published On: 

औरंगाबाद : कोरोना पासून मुक्ती मिळवण्यासाठी लस प्रभावी अस्त्र आहे. महानगरपालिकेने शहरात लसीकरण मोहीम हाती घेतले असून मनपाचे ११७ लसीकरण केंद्र तर खाजगी २६ केंद्र लासिकरणासाठी सज्ज असून या केंद्रांवर जाऊन ४५ वर्षावरील नागरिकांनी लस घ्यावी. असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केले आहे. ३० एप्रिल नंतर लस न घेणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर फिरू देणार नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचा आहे. महानगरपालिकेने शहरातील ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे. १४३ केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे कारण जे नागरिक लस घेणार नाही त्यांना ३० एप्रिल नंतर रस्त्यांवर फिरू दिले जाणार नाही. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मास्क वापर, सुरक्षित आंतर आणि सॅनिटायझर वापर करावा तसेच पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.

१४३ ठिकाणी नागरिक, व्यापाऱ्यांसाठी तर कामगारांसाठी ११  ठिकाणी, बँकां तसेच शासकीय कार्यालयासाठी १० केंद्र सुरू करण्यात आले आहेत. बस स्थानक, रेल्वे स्टेशन हायकोर्ट व इतर शासकीय कार्यालयासाठीही लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. महानगरपालिकेने एक महिन्याचे नियोजन केले असून या एका महिन्यात ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

महानगरपालिका कडे आवश्यक लस उपलब्ध आहे . लसीकरणामुळे शहराला फायदा होईल. . महानगरपालिकेने आतापर्यंत लसीकरण मोहीम मध्ये अतिशय चांगले काम केले आहे . शहराची सतरा लाख लोकसंख्या असून १ लाख ७० हजार नागरिकांना लस देण्यात आली हे प्रमाण दहा टक्के एवढे आहे यानंतर ३० ते ४० टक्के पर्यंत लसीकरण करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे. या नियोजनामुळे राज्यात औरंगाबाद शहर सर्वात जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे कोरोनाला आळा बसेल, शहरात कोरोनाची तणावपूर्ण परिस्थिती असली तरी नियंत्रणात आहे. हळूहळू कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे. असे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले.

माझ्यासह महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर , अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस डी पानझडे यांनाही लस घेतल्यानंतर कोरोना झाला होता. लसीमुळे त्यांना गंभीर परिणाम झाले नाहीत ते लवकर बरे झाले आहेत म्हणून ४५ वर्षावरील नागरिकांनी लस घेणे गरजेचे असून ३० एप्रिल नंतर या वयोगटातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!