Share

“स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं तर हे ‘येड#$%’ सरकार आहे”; नितेश राणेंचा टोला

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं आहे.

आता हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले होते.

हा प्रकार समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. दरम्यान, कंपनीच्या संचालकांकडे जवळपास 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशी दरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.

यावरून आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. भाजप नेते आणी आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. ‘स्वतः करायचे नाही… आणि दुसरे करत असतील, तर करु द्यायचे नाही.. तुमच्यात हिंमत असेल तर, न रडता ५० हजार रेमडीसीवीर जनतेसाठी स्वतःच्या ताकदीवर आणून दाखवा ! नाहीतर स्वतःला मर्द म्हणणे, तरी बंद करा! स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं, तर हे ‘येडझवं सरकार आहे’ ! असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!