मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. राज्यातील सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक मंदीचं सावट, कर्जमाफी योजना, महिला सुरक्षा आणि कोरोना व्हायरसवर उपायांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प मांडण्यात आला.
यापूर्वी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर आज विधान परिषदेत याबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीबाबतचा प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे.
‘सरकार मदतीसाठी कायम तयार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत केली जाईल,’ असे अजित पवार म्हणाले याच वेळी शेतकर्यांना कर्ज घेणे आणि कर्जाची परत फेड करण्यासाठी सोपे होईल असे देखील सभागृहात यावेळी त्यांनी सांगितले तसेच अंतरिम पीककर्जही शून्य टक्के व्याजाने मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. दरम्यान,विशेष म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पामधून मांडली आहे.
दरम्यान, बजेट पूर्णपणे सादर झालं असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचं कि विशिष्ट भागाचा अर्थसंकल्प म्हणायचं असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला आहे. या अर्थसंकल्पाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण निराशा झाली आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरत आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याचा शब्द सरकारने दिला होता. मात्र त्या संदर्भात एकाही पैशाची तरतूद केलेली नाही,’ असं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुनगंटीवार ‘सिनियर’ असूनही तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले; देशमुखांचा चिमटा
- विरोधकांच्या रोषानंतर सचिन वाझेंची बदली होणार; गृहमंत्र्यांनी केली घोषणा !
- आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका; मुनगंटीवारांचा पटोलेंना मिश्किल टोला
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद


